तामिळनाडू : एका 47 वर्षीय व्यक्तीने 8 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे ही घटना घडली. या प्रकरणी आरोपी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हेगार रत्नम मेट्टुपालयम याने ८ वर्षीय मुलीला मैदानात खेळताना बघितले. त्यानंतर तिला थांबवले आणि अश्लील व्हिडिओ दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. हे प्रकरण मार्च महिन्यातील आहे, परंतु 22 एप्रिल रोजी शाळेत झालेल्या वैद्यकीय शिबिरात मुलीने आपल्यासोबत घडलेली घटना डॉक्टरांना सांगितली, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर डॉक्टरांनी मुलीच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. या प्रकरणी फिर्यादीवरून डुडियालूर पोलिस ठाण्यात दोषीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी रत्नमविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…