62 year old woman raped stabbed 25 times by man
नवी दिल्ली : एका 62 वर्षीय महिलेवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आली. पूर्व दिल्लीच्या नवीन अशोक नगरात रविवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. आरोपीने बलात्कार केल्यानंतर या वृद्ध महिलेचा गळा विळ्याने चिरला, नंतर तिच्यावर 25 पेक्षा जास्त वेळा वार करून तिची क्रूरपणे हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या शेजारी राहणाऱ्या 30 वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही वृद्ध महिला भाजी विकण्याचे काम करत होती. तिचा धाकटा मुलगा एका बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. तिचा मुलगा घरी परतला तेव्हा, त्याने आईला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले बघितले, तेव्हा हा गुन्हा उघडकीस आला. त्याने महिलेला तातडीने धर्मशिला रुग्णालयात दाखल केले, परंतु, डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.
माणुसकीला काळिमा! शाळेतील शौचालयात ७ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार
दरम्यान, रुग्णालयातील कर्मचार्यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांची एक टीम रुग्णालयात दाखल झाली. त्यांनी महिलेच्या मुलाचा जबाब नोंदवला. त्याने सांगितले की त्याची आई दल्लुपुरा गावात त्यांच्या घराजवळ भाजीपाला विकते. रविवारी दुपारी ती जेवण बनवण्यासाठी घरी गेली होती, तेव्हा कुणीतरी तिच्यावर हल्ला केला.
प्राथमिक वैद्यकीय तपासणीत या महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. घटनास्थळी गुन्हेगारी पथक व फॉरेन्सिक पथक पाठविण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना एक संशयित आरोपी घरात प्रवेश करताना दिसला. त्यानंतर काही वेळाने तो बाहेर जाताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी ओळख पटवून एका संशयित आरोपीला अटक केली आहे. आरोपीने गुन्हा कबूल केला असून त्याच्याकडून हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे.
बाबो! दोनदा मृत्यूला हरवलं.. व्हेलने मच्छिमाराला जिवंत गिळलं आणि मग…
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…