15-year-old sister in law kidnapped and raped
नवी दिल्ली : ग्रेटर नोएडाच्या बिसरख भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका नराधमाने 15 वर्षीय अल्पवयीन मेहुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. त्याच्या पत्नीने त्याला तुरुंगात पाठवले आहे. अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविदास हा उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरचा रहिवासी आहे. सध्या ग्रेटर नोएडा पश्चिम येथे राहणाऱ्या रविदासने काही काळापूर्वी एका मुस्लिम मुलीशी लग्न केले होते. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीच्या बहिणीचे (वय 15) अपहरण केले. त्यानंतर त्याने तिला एका खोलीत नेले आणि धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. अल्पवयीन मुलीवर अनेक दिवस वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा आरोप आहे.
दरम्यान, बहीण बेपत्ता झाल्यानंतर या महिलेला पतीवर संशय आला. कारण बहीण बेपत्ता झाल्यापासून तिचा पतीही घरी आला नव्हता. त्यामुळे महिलेने पतीविरोधात बिसरख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून कारवाई केली आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे.
मुलीचे मेडिकल केले असून त्यात बलात्काराची पुष्टी झाली आहे. पोलिसांनी आरोपीवर अनेक कलमांनुसार कारवाई केली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…