ncp mp amol kolhe tests covid positive
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ते सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. कोल्हे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते मात्र, तरिही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यानंतर कोल्हे यांनी रुग्णालयातून सर्व नागरिकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे.
खासदार अमोल कोल्हे व्हिडीओच्या माध्यमातून म्हटले की, महाराष्ट्र शासनाची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम असून यावार माझा विश्वास आहे. म्हणूनच कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर शासकीय रुग्णालयाचा मी पर्याय निवडला आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो आहे. आपण आपल्या व्यवस्थांवर विश्वास दाखविला पाहिजे.
ते पुढे म्हटले की, मी दोनवेळा कोरोना प्रतिबंधक लस घेऊन सुद्धा माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाहीये याची प्रचिती मला आलेली आहे. हा डेल्टा व्हेरिएंट असू शकतो. कारण तो लस घेतल्यानंतरची प्रतिकारशक्ती सुद्धा भेदू शकतो. त्यामुळे लस घेतली म्हणजे धोका टळला असे समजून गाफिल राहू नका. सर्वांनी कोरोनाचे नियम, निर्बंध काटेकोरपणे पाळा. विविध माध्यमातून माझे हितचिंतक काळजी व्यक्त करतायत, शुभेच्छा देत आहेत त्यांचे मनापासून आभार मानतो.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…