man tied to a chair and burnt alive
राजस्थान : एका ७ वर्षांच्या मुलाने 14 वर्षांच्या किशोरवयीन मुलावर डिझेल ओतून पेटवून दिले. राजस्थानमधील कोटा शहरातील उद्योग नगर पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली होती. अखेर महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर या मुलाचे दुःखद निधन झाले. याप्रकरणी सात वर्षांच्या मुलावर त्याच्या शेजारच्या 14 वर्षांच्या मुलाला पेटवून मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वृत्तानुसार, या धक्कादायक घटनेत पीडित मुलगा 60 टक्के भाजला होता आणि एक महिन्यापासून एमबीएस रुग्णालयात उपचार घेत होता. बुधवारी 15 जून रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी खुनी हल्ल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या घटनेत हत्येचे कलम जोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत मुलगा व आरोपी दोघेही अल्पवयीन असल्याने या प्रकरणाची बाल न्यायालयात सुनावणी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या जबानीत पीडित मुलाने दावा केला की, 13 मे रोजी उद्योग नगर पोलीस चौकीअंतर्गत असलेल्या प्रेम नगर कॉलनीत आपापल्या घराजवळ खेळत असताना त्याच्यात आणि सात वर्षीय आरोपीमध्ये हाणामारी झाल्यानंतर हा हल्ला झाला.
१3 मे रोजी प्रेम नगर तृतीय येथील पंचमुखी चौकाजवळ ही मुले एकमेकांबरोबर खेळत होती. यादरम्यान त्यांच्यात हाणामारी झाली. त्यानंतर 7 वर्षांच्या मुलाने रागाच्या भरात जवळच उभ्या असलेल्या त्याच्या वडिलांच्या ऑटो-रिक्षातून डिझेलची बाटली घेतली आणि त्याच्यावर डिझेल टाकून त्याला माचिसने पेटवून दिले. त्यानंतर भाजलेल्या मुलाने जवळच गुरांसाठी पिण्याचे पाणी भरण्यासाठी ठेवलेल्या सिमेंटच्या टाकीत उडी मारली. मात्र, तोपर्यंत तो बराच भाजला होता. दरम्यान, आवाज ऐकून त्यांचे कुटुंबीय व शेजारी तिथे आले. त्यानंतर त्यांनी या मुलाला एमबीएस हॉस्पिटलच्या बर्न वॉर्डमध्ये दाखल केले. जिथे उपचारादरम्यान 15 जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. यानंतर शवविच्छेदन करून मुलाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
संसर्गामुळे मृत्यू : अल्पवयीन मुलाच्या पेशी खूप जळाल्या होत्या, ज्यामध्ये संसर्ग सतत पसरत होता, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यासोबतच हत्येचे कलमही जोडण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कोणीही पाहिली नाही. या प्रकरणी न्यायमूर्तींनी देखील भाजलेल्या मुलाचे जबाब घेतले होते, हे जबाब रुग्णालयाच्या बर्न वॉर्डमध्ये घेण्यात आले होते.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…