13-year-old girl raped and murdered
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील बौंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी कसून तपास करत १२ तासांतच आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे हा आरोपी या मुलीच्या घरी ड्रायव्हरची नोकरी करत होता. त्याने मुलगी घरी एकटी असताना तिचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी ही मुलगी आपल्या वडिलांच्या दुकानातून घरी आली होती. ती घरात एकटी असल्याचे बघताच आरोपीने तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या केली. या मुलीचा मृतदेह तलावाच्या जवळ फेकला. ही घटना उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात बलात्कार, पॉक्सो अॅक्ट, हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी १२ तासांतच या गुन्ह्याचा उलगडा करत संशय आणि पुराव्यांच्या आधारे फूलचंद नावाच्या व्यक्तीला अटक केली. पोलिसांची पथके नेमून गुन्ह्याचा तपास आणि आरोपींचा शोध घेण्यात येत होता. आरोपी या मुलीच्या घरी ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याने हत्येची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…