IPL 2021: Match between Punjab Kings and Rajasthan Royals today
IPL २०२१ : IPL २०२१ चा सीझनमधील चौथा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. सामना आज रात्री ७.३० वाजता सुरू होईल. राजस्थान संघ वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरविना मैदानात उतरेल. कारण तो सध्या जखमी आहे.
गेल्या मोसमात राजस्थानने दोन्ही सामन्यांमध्ये पंजाबचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला पंजाबची टीम घेईल. या दोघांमध्ये आतापर्यंत एकूण 21 सामने झाले आहेत. यामध्ये राजस्थानने 21 पैकी 12 सामने जिंकले आहेत. तर, पंजाबने केवळ 9 सामने जिंकले. मागील हंगामात पंजाबचा संघ सहाव्या आणि राजस्थानचा संघ आठव्या स्थानावर राहिला होता.
पंजाब संघाने या मोसमात आपल्या संघाचे नाव आणि लोगो बदलले. फ्रेंचायझीने किंग्ज इलेव्हन पंजाबचे नाव बदलून पंजाब किंग्ज केले. तर राजस्थान संघाने कर्णधार आणि संचालक बदलले. लिलावापूर्वी फ्रँचायझीने माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला रिलीज केले. तसेच संघाचे संचालक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनाही काढून टाकले. विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनला नवा कर्णधार आणि कुमार संगकाराला संचालक म्हणून नेमण्यात आले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…