Famous Writer Novelist Bharat Kale Passed Away Due To Covid 19
औरंगाबाद : प्रसिद्ध लेखक आणि कादंबरीकार भारत काळे यांचे रविवारी दुपारी चारच्या सुमारास करोनाने निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. गेल्या पंधरा दिवसांपासून ते करोनाने आजारी होते. औरंगाबाद येथे उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
भारत काळे हे मराठीतील प्रसिद्ध लेखक होते तसेच ते बाराशिव शिक्षण प्रसारक मंडळ, परभणी येथे कार्यरत होते. ‘ऐसे कुणबी भूपाळ’, ‘दीक्षा’ ही पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. काळे यांच्या निधनाने सर्व मित्र, परिचित आणि साहित्य वर्तुळातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.भारत काळे हे काळाचा वेध घेऊन लेखन करणारे कादंबरीकार आहेत. त्यांनी केलेली मानसशास्त्रीय अंगाची मांडणी ही त्यांच्यातल्या वेगळेपणाची ओळख करून देणारी आहे. त्यांनी मानवी मनाचे अनेक धागे वाचकांच्या समोर आपल्या साहित्यातून मांडले आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…