कोरोना

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवीन नियमावली जाहीर, प्रवासासाठी RT-PTC निगेटिव्ह चाचणी अनिवार्य

मुंबई : राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत प्रसिद्ध केलेल्या नव्या नियमावलीत आदेश देण्यात आले कि लांब पल्लाच्या ट्रेनने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचे स्क्रिनिंग करणे अनिवार्य आहे केवळ कोरोनाची लक्षणे नसणाऱ्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. हे आदेश आजपासून कोरोनाचे संकट असेपर्यंत लागू राहणार आहेत.

लांब पल्ल्यांच्या ट्रेनद्वारे परराज्यातून कोरोनाच्या दृष्टीने संवेदनशील भागातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवासाच्या वेळेपासून ४८ तासांमध्ये करण्यात आलेली आरटी-पीटीसी निगेटिव्ह चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची माहिती प्रवासी जाणाऱ्या जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे ट्रेनची तपशीलवार माहिती देखील प्राधिकरणाला देणे गरजेचे असल्याचे आदेशात म्हटले आहे.

प्रवाशांना करोनाच्या काळात पाळावयाच्या नियमांबाबत माहिती व्हावी यासाठी रेल्वेने प्रत्येक स्थानकात अनाउंसमेंट करणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक नियमांची माहिती असलेली छापील पत्रके देखील प्रवाशांना देणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे. ही पत्रके मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेत लिहिलेली असायला पाहिजे, असे आदेशात म्हटले आहे. सर्व प्रवाशांनी प्रवासादरम्यान मास्क घालणे बंधनकारक असेल.

  1. सर्व प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढताना अथवा उतरताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक असेल.
  2. प्रवाशांसाठी सर्व स्थानकांवर थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करणे बंधनकारक असेल.
  3. गर्दी होऊ नये यासाठी थर्मल स्क्रिनिंगसाठी प्रवाशांनी ट्रेनच्या वेळेआधी स्थानकात येणे अपेक्षित आहे.
  4. ई-तिकिटे आणि मोबाईल तिकिटांचा जास्तीत जास्त वापर करणे योग्य असेल.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

7 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

7 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

7 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago