ipl 2021 dc vs pbks live t20 score delhi capitals chase down 196 runs 182 overs 6 wickets
IPL 2021, DC vs PBKS T20 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. पंजाबने दिल्लीला १९६ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान दिल्लीने १८.२ षटकात ४ विकेट्स गमावत सहज पार केले. दिल्लीच्या विजयात शिखर धवनने मोलाचा वाटा उचलला.
दिल्लीला विजयाच्या समीप पोहचवल्यानंतर शिखर बाद झाला होता. पण तो बाद झाल्यानंतर रिषभ पंत आणि मार्कस स्टॉयनिसने दिल्लीला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी पंतचा १८ व्या षटकात दीपक हुडाने सुरेख झेल घेतला. त्यामुळे पंतला १५ धावा करुन माघारी परतावे लागले. अखेर मार्कस स्टॉयनिस आणि ललित यादवने दिल्लीला विजयापर्यंत पोहचवले. स्टॉयनिस २७ धावावंर आणि ललित १२ धावांवर नाबाद राहिला.
पंजाबकडून झाय रिचर्डसनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर रिले मेरिडथ आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी १ विकेट घेतली.
पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १९५ धावा केल्या आणि दिल्लीला १९६ धावांचे आव्हान दिले.
पंजाबकडून केएल राहुलने अर्धशतक केल्यानंतर पुढेही गेलच्या साथीने चांगला खेळ सुरु ठेवला होता. मात्र तो १६ व्या षटकात ५१ चेंडूत ६१ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ ख्रिस गेल ११ धावावंर आणि निकोलस पुरन ९ धावांवर बाद झाला. पण अखेर दिपक हुडा आणि शाहरुख खान यांनी पंजाबला १९५ धावांपर्यंत पोहचवले. हुडा २२ धावांवर आणि शाहरुख १५ धावांवर नाबाद राहिले.
दिल्लीकडून ख्रिस वोक्स, आवेश खान आणि कागिसो रबाडाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…