कोरोनामुक्त झालेल्या वुहानमधील ९०% रुग्णांची फुफ्फुसे खराब

जगभरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. दरम्यान कोरोना विषाणू आणि त्याच्या संसर्गामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. दरम्यान, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
चीनमधील वुहानमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची फुप्फुसे खराब झाल्याचे संशोधनातून समोर आले आहे. त्याबरोबरच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपैकी ५ टक्के रुग्ण पुन्हा संसर्ग होऊन रुग्णालयात भरती झाले आहेत. वुहान युनिव्हर्सिटीच्या डॉक्टरांनी केलेल्या सर्वेमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हॉस्पिटल्स इंटेंटिव्ह केअर युनिट्सचे संचालक पेंग झियोंग यांच्या नेतृत्वाखाली वुहान विद्यापीठाच्या झॉन्गनँग रुग्णालयात एक पथक कार्यरत आहे. यामध्ये वुहानमधील कोरोनामुक्त झालेल्या १०० रुग्णांचा एक सर्व्हे करण्यात आला. हे पथक या रुग्णांवर एप्रिल महिन्यापासून लक्ष ठेवून होते. वेळोवेळी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत होते. दरम्यान, एक वर्ष चालणाऱ्या या सर्वेचा पहिला टप्पा जुलै महिन्यात संपला. या सर्वेमध्ये समावेश केलेल्या रुग्णांचे सरासरी वय ५९ वर्ष एवढे आहे.

दरम्यान, या सर्व्हेच्या पहिल्या टप्प्यातील निष्कर्षांमध्ये ९० टक्के रुग्णांची फुप्फुसे पूर्णपणे बिघडण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून आले. म्हणजेच या रुग्णांच्या फुप्फुसांचे व्हेंटिलेशन आणि गॅस एक्सचेंज फंक्शन योग्य पद्धतीने काम करत नसल्याचे समोर आले आहे.

पेंग यांच्या पथकाने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसोबत सहा मिनिटांची वॉक टेस्ट केली. त्यामध्ये हे रुग्ण सहा मिनिटांमध्ये केवळ ४०० मीटरच चालू शकत असल्याचे दिसून आले. सर्वसाधारणपणे सुदृढ व्यक्ती सहा मिनिटांमध्ये ५०० मीटर अंतर कापू शकते. काही रुग्णांना तीन महिन्यांनंतरही ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करावा लागत आहे. एवढेच नाही तर १०० पैकी १० रुग्णांमधील कोरोनाविरोधात लढणाऱ्या अँटिबॉडीदेखील संपुष्टात आल्या आहेत.
पाच टक्के रुग्ण कोविड-१९ न्यूक्लिक टेस्टमध्ये निगेटिव्ह दिसत आहेत. तर इम्युनोग्लोब्युलिन एम टेस्टमध्ये पॉझिटिव्ह दिसत आहेत. म्हणजेच अशा रुग्णांना पुन्हा एकदा क्वारंटाइन व्हावे लागणार आहे.
मात्र या व्यक्तींना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला आहे की, जुना आजार त्यांना पुन्हा पुन्हा बाधित करत आहे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान, कोरोनातून सावरलेल्या रुग्णांच्या शरीरातील विषाणूविरोधात लढणाऱ्या टी सेलच्या संख्येमध्येही मोठी घट झाल्याचे दिसून आले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

राज ठाकरे हे कोत्या मनाचे नसून मोठ्या मनाचे व्यक्ती, मुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरेंचे कौतुक

ठाणे : राज ठाकरे हे मोठ्या मनाचे व्यक्ती असून कोत्या मनाचे नाहीत, असे एकनाथ शिंदे…

6 मि. ago

सातारा जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी-कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती

सातारा : लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ४ मे २०२४ हा दिवस मतदार गृहभेट दिवस…

1 तास ago

निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी विदेशी प्रतिनिधी मंडळाचे अलिबाग येथे आगमन

रायगड : भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी…

1 तास ago

मतदान केंद्रांवरील ‘पाळणाघरे’ सज्ज ठेवा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, दि.४ (जिमाका): मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या मातांची बालके सांभाळण्यासाठी मतदान केंद्रांवर पाळणाघरांची सुविधा…

2 दिवस ago

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारु जप्तीची मोठी कारवाई

जळगाव, दि. 4 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जळगाव राज्य उत्पादन शुल्क…

2 दिवस ago

पद्म पुरस्कारांसाठी नामांकने मागविण्याचे आवाहन; १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

नवी दिल्ली : केंद्रसरकार प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करत असते. त्यास अनुसरून यावर्षीही पद्म…

3 दिवस ago