शेती

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अधिकाधिक महत्त्व द्यावं, सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींवर जोरदार निशाणा

दूध दरावरून महायुती, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आणि विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन सुरू आहेत. या आंदोलना दरम्यान सोलापूर येथे माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर भंपक आणि फालतू माणसासोबत पुन्हा काम करणार नाही, अशा शब्दात टीका केली होती.

या टीकेला उत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टीवर जोरदार निशाणा साधला आहे. कोरोनामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणे मिळाले, दुधाला दर नाही, शिवाय शेतकऱ्यांना सरासरी 34 टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. आता शेतकऱ्यांच्या या साऱ्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. स्वाभिमानी संघटनेच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिकाधिक महत्त्व द्यावं, असं खोत म्हणाले.

खोत म्हणाले की, ठीक आहे, आम्ही फालतू माणसं होतो पण आम्ही फालतू माणसांनी संघटना वाढवली. त्यामुळे तुम्ही आमदार, दोनवेळा खासदार होऊ शकला. शेतकऱ्यांचे नेते म्हणून तुम्ही राज्य करू शकला. पण मला त्यांच्यासारखं सरड्यासारखे रंग बदलता येत नाही. त्यामुळेच अशा भंपक माणसाविषयी फार बोलावे, अशी माझी इच्छा नाही. त्यांनी निश्चितपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवावा, सदाभाऊच्या विषयावर आवाज उठविण्यासाठी अजून चार वर्षे बाकी आहेत. 2024 ला आपण आमने-सामने येऊ शकतो आणि एकमेकांना उत्तर देऊ शकतो, असा इशारा खोत यांनी दिला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago