मुंबई

प्रसिद्ध चित्रकार राम कामत यांची राहत्या घरी आत्महत्या, मृतदेह बाथटबमध्ये

प्रसिद्ध चित्रकार राम कामत यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली, त्यांचा मृतदेह बाथटबमध्ये सापडला असून त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले की, ‘माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये तसेच त्यांनी काढलेली चित्रं त्यांच्या मित्रांना त्यांची आठवण म्हणून देण्यात यावीत’

राम कामत बुधवारी संध्याकाळी आंघोळ करण्यासाठी गेले. त्यानंतर बराच वेळ झाला तरी ते बाथरूममधून बाहेर आले नाहीत, त्यामुळे त्यांच्या आईने दरवाजा ठोठावला. मात्र दरवाजा आतून बंद केला नव्हता. त्यांची आई जेव्हा आत गेली, तेव्हा ते बेशुद्धावस्थेत बाथ टबमध्ये पडले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

राम कामत हे एक चित्रकार होते. ते ४१ वर्षांचे होते. मुंबईतील माटुंगा येथे ते आपल्या आई आणि बहिणीसोबत राहत होते. त्यांचं लग्न झालं नव्हतं. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ते डिप्रेशनमध्ये होते आणि त्यांच्यावर उपचारही सुरु होते. ते डिप्रेशनमध्ये का होते याचं कारण कळू शकलेलं नाही. पोलिसांनी एडीआर दाखल करून याचा तपास करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, पोस्टमार्टम रिपोर्ट उद्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. तर विसरा रिपोर्टला काही वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे रिपोर्ट आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. राम यांचा मृत्यू बाथरूम टबमध्ये बुडून झाला की, त्यांनी कुठचा विषारी द्रव्यपदार्थ घेतला होता? हे त्यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होईल.

 

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago