महाराष्ट्र

पूरबाधितांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. 23 : पूरस्थितीत बाधित झालेल्या नागरिकांच्या पाठीशी शासन व प्रशासन ठामपणे उभे आहे. त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. तसेच, शेतातील पाणी ओसरताच नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

पालकमंत्र्यांनी शनिवारी वाळवा तालुक्यातील जुने खेड, औदुंबर येथील दत्तमंदिर परिसर, मौलानानगर, पलूस तालुक्यातील भिलवडी तसेच सांगली महापालिका क्षेत्रातील सूर्यवंशी प्लॉट येथे पूरस्थितीची पाहणी केली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रशासनाने दिलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. यावेळी सांगलीतील सेकंडरी हायस्कूल, सहकार भवन व मार्केट यार्डमधील निवारा केंद्रांना भेट देऊन तेथील व्यवस्थेची तपासणी केली.

पूरग्रस्तांशी संवाद साधताना पाटील म्हणाले, “नैसर्गिक आपत्तीचे आव्हान पेलताना नागरिकांनी भविष्यकालीन संकटे ओळखून तयारी ठेवली पाहिजे. पुरप्रवण गावात पाण्याची सर्वोच्च पातळी रंगाने दर्शवावी, जेणेकरून नागरिकांना वेळीच स्थलांतर करता येईल. रोगराई टाळण्यासाठी तातडीने साफसफाई व औषधफवारणी करावी. नुकसानीचे पंचनामे वेळेत होऊन बाधितांना मदत मिळावी यासाठी प्रशासनाने काटेकोर पावले उचलावीत.”

पूरस्थितीत त्यांनी स्वतः पूरग्रस्तांबरोबर भोजन करून अन्नाचा दर्जाही तपासला. 2019 आणि 2021 च्या महापुराचा संदर्भ देत त्यांनी कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी पर्याय सुचवले. “वारंवार पूरग्रस्त होणाऱ्या ठिकाणी रिकामी जागा ठेवून पहिल्या मजल्यापासून बांधकाम करण्याचा विचार केला पाहिजे,” असेही ते म्हणाले.

अतिवृष्टीमुळे जीवितहानी व जनावरांचे नुकसान झाले नसल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले. “सांगली जिल्ह्यातील प्रशासकीय समन्वय उत्तम असल्याने पूरस्थितीत निवारा केंद्रातील जेवण, आरोग्यसुविधा यशस्वीपणे पार पडल्या,” असे त्यांनी सांगितले.

अलमट्टी धरणाच्या उंची वाढीच्या प्रस्तावावर भाष्य करताना पाटील म्हणाले, “कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बॅकवॉटरचा फटका बसू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने स्पष्ट भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारची मांडणी भक्कमपणे करण्यात येत असून, अलमट्टीची उंची वाढवू देणार नाही, याची नागरिकांनी खात्री बाळगावी,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

या पाहणी दौऱ्यात आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, रणजीत भोसले, उत्तम दिघे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago