महाराष्ट्र

‘रक्षक’च ठरला भक्षक! सुरक्षारक्षकानेच फोडले घर, पुण्यातून लाखोंचे दागिने लंपास

पुणे : सिंहगड रस्त्यावरील गणेशमळा येथील एका सोसायटीतील सुरक्षारक्षकानेच घरफोडी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या सुरक्षारक्षकाला अटक करून त्याच्याकडून तब्बल आठ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

अटक करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव राकेशकुमार मुलचंद सोनी (वय २९, रा. राम अमिलिया, जि. अनुपपूर, मध्य प्रदेश) असे आहे. तो सिंहगड रस्ता परिसरातील गणेशमळा येथे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, ८ ते १२ ऑगस्ट या कालावधीत तक्रारदार बाहेरगावी गेले होते. यादरम्यान सुरक्षारक्षक सोनी यानेच सदनिकेचे कुलूप तोडून घरातील कपाटातून सोन्याचे दागिने चोरले. यात एकूण दहा तोळे दागिने असून त्याची किंमत आठ लाख ६५ हजार रुपये एवढी आहे. १२ ऑगस्ट रोजी तक्रारदार परत आल्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला. त्यानंतर पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजसह घरकाम करणारे, रहिवासी आणि सुरक्षारक्षकांची चौकशी करण्यात आली. त्यातून सुरक्षारक्षक सोनी याच्यावर संशय बळावला. ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेच चोरीची कबुली दिली.

या कारवाईत गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, उपनिरीक्षक किरण पवार, तसेच पोलीस कर्मचारी प्रकाश मरगजे, अमोल दबडे, महेश मंडलिक, अमित चिव्हे, सूर्या जाधव, श्रीकांत शिंदे, सद्दाम शेख, मनोज बनसोड, नानासाहेब खाडे व राकेश सुर्वे यांनी सहभाग घेतला.

सोसायटीतील सुरक्षारक्षकानेच घरफोडी केल्याने परिसरातील रहिवाश्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago