तंत्रज्ञान

आत्मनिर्भर भारत : भारतीय लष्कराने डेव्हलप केलं Whatsapp सारखं मेसेजिंग अॅप

‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेंतर्गत भारतीय लष्कराने एक नवीन मेसेजिंग अॅप डेव्हलप केलं आहे. इंडियन आर्मीकडून लाँच करण्यात आलेल्या या मेसेजिंग अॅप ला ‘Secure Application for the Internet (SAI)’ नाव दिले आहे. हे अॅप इंटरनेट द्वारे अँड्रॉयड प्लॅटफॉर्मवर अँड टू अँड सिक्योर व्हाईस, टेक्स्ट आणि व्हिडिओ कॉलिंग सर्विस सपोर्ट करते. गुरुवारी संरक्षण मंत्रालयाने याची माहिती दिली आहे.

मंत्रालयाने एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले, लष्कराकडून बनवण्यात आलेले हे अॅप व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, SAMVAD आणि GIMS सारखे आहे. हे अँड टू अँड एनक्रिप्शन मेसेजिंग प्रोटोकॉलचा वापर करते. SAI लोकल इन-हाउस सर्वर आणि कोडिंग सोबत सिक्यॉरिटी फीचर्स सह बाकीच्या अॅप्सला चांगले बनवते. या फीचर्सला आवश्यकेनुसार बदलले जावू शकते.

अॅप ची CERT-in आणि आर्मी सायबर ग्रुप च्या पॅनल ऑडिटर्स द्वारा चाचणी करण्यात आली आहे. तसेच NIC वर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स (IPR) साठी फायलिंग वर काम सुरू आहे. यासाठी iOS प्लॅटफॉर्म वर अॅप आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.

संरक्षण मंत्रालयाने पुढे सांगितले, SAI चा पूर्ण लष्करासाठी वापर केला जाणार आहे. या सर्विस सोबत सिक्योर मेसेजिंगची सुरुवात होऊ शकते. अ‍ॅपच्या कार्यक्षमतेचा आढावा घेतल्यानंतर संरक्षण मंत्र्यांनी कर्नल साई शंकर यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago