तंत्रज्ञान

होंडाची ‘हायनेस सीबी 350’ ही 350-500 सीसी बाइक लाँच

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) गुरुवारी भारतात मीड-साइज 350-500 सीसी सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. कंपनीने हायनेस सीबी 350 ही नवी बाइक बाजारात आणली असून तिची किंमत 1.85 लाख रुपये आहे. कंपनीकडून प्राप्त झालेली ही बाइक ‘बिगविंग’ पोर्टफोलिओ मधील तिसरे बीएस-वीआय मॉडेल आहे. जे एक्सक्लुझिव्ह प्रीमियम बाइक व्हर्टिकल आहे.

‘हायनेस सीबी 350’ ही बाइक ९० टक्क्यांहून अधिक प्रमाणात देशांतर्गत उत्पादित केली गेली आहे. हरियाणाच्या मानेसर येथील कंपनीच्या प्लांटमध्ये याची निर्मिती केली जात आहे. कंपनीने म्हटले आहे की, प्रथम त्यांचा प्रयत्न हा भारतीय बाजाराची मागणी पूर्ण करण्यावर असणार आहे. त्यानंतर ते इतर देशातील बाजारपेठेत प्रवेश करतील. कंपनीने‘बिग विंग’स्टोअरमध्ये त्याची बुकिंग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

हायनेस सीबी 350 बाइकमध्ये शक्तिशाली 350 सीसी एअर कूल्ड 4-स्ट्रोक ओएचसी सिंगल-सिलिंडर इंजिन आहे. जे पीजीएम-एफआय तंत्रज्ञानाने सज्ज आहे. यात ड्युअल डिस्क ब्रेक, ड्युअल चॅनेल एबीएस आणि इतर फीचर्ससह एक १५ लिटर इंधन टाकी आहे. यात अतिरिक्त दृश्‍यमानतेसाठी फ्रंट आणि बॅक-एंड फुल एलईडी सेटअप आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago