North Korean dictator Kim Jong-un
प्योंगयांग : उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग-उन कठोर स्वभाव असलेले नेते म्हणून ओळखले जातात. किंम जोंग उन बाबत खुलासा करणारा एक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, सत्ताधारी कामगार पक्षाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त किम यांनी जनतेची माफी मागितली तसेच त्यांच्या डोळ्यात अश्रूही दिसले.
‘न्यूजवीक’ च्या अहवालानुसार सध्या उत्तर कोरियावर आणि किम जोंग-उन यांच्यावर काही काळ दबाव येत होता. ते शनिवारी किमच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते, जेव्हा कामगार पक्षाच्या 75 व्या वर्धापनदिनाला किम यांनी ‘कठीण काळात’ देशातील लोकांसोबत न उभे राहिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले.
या प्रसंगी एका जाहीर भाषणादरम्यान किम म्हणाले, “लोकांनी आकाशातील उंची आणि समुद्राच्या खोलीइतकाच माझ्यावर विश्वास व्यक्त केला, परंतु मी त्यांच्या अपेक्षांनुसार वागण्यात नेहमीच अपयशी ठरलोय. मला खरंच याची खंत आहे. माफ करा” असं बोलल्यानंतर किम अश्रू पुसताना दिसले. अहवालात असेही म्हटले आहे की, हा उत्तर कोरियाच्या लोकांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्नदेखील असू शकतो, जे देशाच्या आंतरराष्ट्रीय बंदीमुळे अनेक अडचणींना तोंड देत आहेत. अहवालानुसार किम देशातील व्यापक दारिद्र्य, उपासमार दूर करण्यात अपयशी ठरले आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…