महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन

नगर   : भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील दिवंगत पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मकथेचं प्रकाशन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या प्रकाशन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (13 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. तसेच विखे पाटील यांच्या स्मरणार्थ प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नामांतर करुन, त्या संस्थेला ‘लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था’ असे नाव देण्यात आले.

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, की सहकार निःपक्ष असतो. `देह वेचावा कारणी` या नावात मोठा अर्थ आहे. त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे, की शेतीत काैशल्य असल्याशिवाय सुशिक्षित माणूसही शेती करू शकत नाही. बाळासाहेब विखे पाटील यांच्या मनात हा प्रश्न उगीच नाही आला. त्यामागे मोठा त्याग आहे. बाळासाहेब विखे पाटील यांनी शेतकऱ्यांचे दुःख स्वतः पाहिले. अनुभवले. सहकार वाढविण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. नगर जिल्ह्यात ऊसाचे मोठे उत्पादन होते. शेतीची क्रांती, दुधाची क्रांती गुजरातमध्ये झाली. गहू हरिणाना, पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित झाला. हेच माॅडेल देशाला पुढे घेऊन जाणार आहे, असे मोदी यांनी सांगून सहकार क्षेत्राचा गाैरव केला.

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्रच नाहीतर देशाच्या अनेक भागात मंत्रिपदाच्या काळात काम केलं. ज्या काळात ग्रामीण भागांत शिक्षणाची चर्चाही होत नव्हती, अशा काळात त्यांनी शिक्षण संस्था सुरु केल्या. साखर उद्योगला चालना दिली. शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले, शेतकऱ्यांची उत्पादकता, उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले. नव्या जुन्याचा मेळ घालून शेती केली पाहिजे. इथेनॉलचा वापर जसाजसा वाढेल तसा तेलासाठी बाहेर जाणारा पैसा शेतकऱ्यांना मिळेल, हे त्यांनी दाखवून दिलं.’

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago