क्रीडा

IPL 2020 : आज दुबईमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील उत्तरार्ध सुरू झाला आहे. लीगमधील सर्व संघ आजपासून पुन्हा समोरासमोर उभे राहतील. लीगचा 29 वा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजेपासून दुबईमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. हैदराबादविरुद्धच्या त्यांच्या मागील पराभवाचा बदला घेण्याची संधी चेन्नईला असेल. चेन्नई आणि हैदराबाद या दोघांमध्ये एकूण 13 सामने खेळले गेले असून चेन्नईने 9 आणि हैदराबादने 4 विजय मिळविले आहेत.

दुबई येथील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते. येथे स्लो विकेट असल्याने स्पिनर्सनाही खूप मदत होईल. नाणेफेक जिंकणार्‍या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला यंदाच्या आयपीएल मध्ये अद्याप चांगली कामगिरी करता आलेली नाही. चेन्नईचा संघ सात सामन्यांपैकी दोन सामने जिंकून अवघ्या चार गुणांसह सातव्या स्थानी आहे. हैदराबादविरुद्धच्या मागील लढतीत त्यांना सात धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

सलामीवीर शेन वॉटसन आणि फॅफ डय़ू प्लेसिस सातत्याने योगदान देत आहेत. परंतु मधल्या फळीत धोनीसह अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा यांनी अद्याप हवी तशी कामगिरी पार पाडली नाही. केदार जाधवच्या जागी गेल्या लढतीत एन. जगदीशनला स्थान देण्यात आले होते. परंतु तोही फारसा प्रभाव पाडू शकला नाही. शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर ही वेगवान भारतीय जोडी चेन्नईच्या गोलंदाजीची धुरा वाहत असून फिरकीपटू कर्ण शमाने उत्तम गोलंदाजी केली आहे. सॅम करण अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावत आहे.

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघामध्ये फलंदाजीत वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्यापैकी किमान एकाने मोठी खेळी साकारणे आवश्यक आहे. मधल्या फळीत केन विल्यम्सन आणि मनीष पांडे खेळतात. तसेच युवा प्रियम गर्ग आणि अब्दुल समद या युवांवर अवलंबून राहणे हैदराबादला महागात पडू शकते. भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीचा फटका गेल्या लढतीत हैदराबादला बसला. फिरकीपटू रशिद खान वरच हैदराबादच्या गोलंदाजीची भिस्त असेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago