IPL 2020: RCB won the match against KKR by 82 runs
RCB ने शारजाच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सचा धुव्वा उडवला. १९५ धावसंख्येचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला KKR संघ केवळ ११२ धावांपर्यंत मजल मारु शकला आणि RCB ने ८२ धावांनी विजय मिळवला. RCB कडून फलंदाजीत एबी डिव्हीलियर्सने आक्रमक अर्धशतक झळकावलं, पण संघाचे गोलंदाज खऱ्या अर्थाने विजयाचे शिल्पकार ठरले.
RCB चा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर देवदत पडीकल आणि फिंच यांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली. RCB ची ही जोडी मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत असतानाच आंद्रे रसेलने पडीकलचा त्रिफळा उडवत संघाला पहिलं यश मिळवून दिलं. पडीकलने ३२ धावा केल्या. यानंतर फिंच आणि विराट कोहलीने पुन्हा एकदा भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू फिंचला बाद करत प्रसिध कृष्णाने KKR ला दुसरं यश मिळवून दिलं. परंतू कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हीलियर्स यांनी फटकेबाजी करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत संघाला धावांचा टप्पा गाठून दिला. डिव्हीलियर्सने नाबाद ७३ तर विराट कोहलीने नाबाद ३३ धावा केल्या. KKR कडून प्रसिध कृष्णा आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
१९५ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने सावध सुरुवात केली. संघात स्थान मिळालेल्या टॉम बँटनला गिलसोबत सलामीला संधी देण्यात आली. मात्र नवदीप सैनीने इनस्विंगवर बँटनचा त्रिफळा उडवत कोलकात्याला पहिला धक्का दिला. नितीश राणा, शुबमन गिल, दिनेश कार्तिक, मॉर्गन, रसेल असे नावाजलेले फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. शुबमन गिलने सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगली झुंज दिली. यानंतर मधल्या फळीत आंद्रे रसेलने फटकेबाजीचा प्रयत्न केला. परंतू RCB च्या माऱ्यासमोर त्यांचे प्रयत्न कमी पडले. १५ षटकं पार पडल्यानंतरही KKR चा संघ १०० धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही. RCB कडून वॉशिंग्टन सुंदर आणि ख्रिस मॉरिसने प्रत्येकी २ तर सैनी, सिराज, चहल आणि उदाना यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…