तंत्रज्ञान

मस्तच! BSNL चा जबरदस्त प्लॅन, 110 दिवसांसाठी मिळवा 220GB डेटा आणि…

BSNL prepaid plan : खासगी दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड रिचार्जच्या किमतीत वाढ केली आहे, असे असले तरी सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी बीएसएनएल मात्र अजूनही जुन्याच दरावर कायम आहे. बीएसएनएलकडे अशा अनेक योजना आहेत ज्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि Vi ला टक्कर देतात. आज आपण BSNL च्या अशाच एका प्लॅनबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये 110 दिवसांसाठी 220GB डेटा मिळतो.

BSNL 666 प्रीपेड प्लॅन
BSNL च्या 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 110 दिवसांची वैधता मिळते. यामध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे एकूण डेटा 220GB होईल. मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, डेटाचा वेग 40Kbps पर्यंत घसरतो. प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दिले जातात. याशिवाय मोफत कॉलरट्यून्स आणि लोकधुन कंटेंटचे सदस्यत्व दिले जाईल.

जिओचा ६६६ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओचा ६६६ रुपयांचा प्लॅन ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये तुम्हाला दररोज 1.5 GB डेटा ऑफर केला जातो. अशा प्रकारे एकूण डेटा 126 GB होईल. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS आणि Jio ऍप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.

Airtel-Vi 666 रुपयांचा प्लॅन
Airtel आणि Vodafone-Idea ची समान योजना आहे. यामध्ये ७७ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे एकूण डेटा 115.5GB होतो. प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दिले जातात.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

4 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago