देश

फोटोग्राफरने 60 वर्षीय मजुराला बनवले ग्लॅमरस मॉडेल

केरळ : लुंगी आणि शर्ट घातलेल्या 60 वर्षांच्या रोजंदारीवरील कामगाराने कल्पनाही केली नसेल की एक दिवस तो त्याच्या मॉडेलिंग टॅलेंटमुळे इंटरनेट जगतात चर्चेचा विषय बनेल. ममिक्का असे या मजुराचे नाव असून तो मूळचा केरळमधील कोझिकोड शहरातील आहे. एका छायाचित्रकाराने (shk_digital) या मजुराला त्याच्या प्रोजेक्टसाठी निवडले तेव्हा मम्मिकाचा सुपर ग्लॅमरस मेकओव्हर इंटरनेटवर आला.

हा फोटोग्राफर शारिक वायलील (Shareek Vayalil) आहे, ज्याने या कामगारामध्ये दडलेली प्रतिभा ओळखली आणि त्याला त्याच्या एका प्रोजेक्टसाठी मॉडेल म्हणून सादर केले. खरं तर, वायलीलने यापूर्वी देखील त्याच्या सोशल मीडिया पेजवर मम्मिकाचा एक फोटो शेअर केला होता, जो अभिनेता विनायकन सारखाच दिसत होता, त्यामुळे तो व्हायरल झाला होता.

जेव्हा ही असाइनमेंट आली तेव्हा शारिकने सर्वप्रथम मम्मिकाचा विचार केला. त्याने लगेचच ६० वर्षीय मजुराला या प्रकल्पाची माहिती दिली, त्यानंतर कलाकार मजनसने (Majnas) त्याच्यावर असा मेकओव्हर केला की सोशल मीडियावरील लोक मम्मिकाच्या स्वॅगचे कौतुकच करत सुटले. आशिक फुआद आणि शबीब वायलील हे मेकअप असिस्टंट होते.

मुळात, हे फोटोशूट एका स्थानिक फर्मच्या प्रमोशनसाठी केले गेले होते, ज्यामध्ये मम्मिका सूट-बूटमध्ये, चष्मा घालून आणि हातात आयपॅड धरून पोज देत आहे. निश्चितच त्यांचा लूक एखाद्या प्रोफेशनल मॉडेलपेक्षा कमी दिसत नाही. ममिका त्यांच्या या यशाने खूप खूश आहेत. कामासोबतच अशा ऑफर्स मिळाल्यास मॉडेलिंग सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितलं. mammikka_007 नावाचे एक Instagram पेज आहे, जिथे आता तुम्ही त्यांना सामान्य कपड्यांसोबत ग्लॅमरस लूकमध्ये पाहू शकता.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago