Bengaluru vs Kolkata and Delhi vs Punjab
IPL २०२१ डबल हेडर : IPL २०२१ च्या पहिल्या डबल हेडरमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुपारी ३.३० वाजता सामना रंगणार आहे. चेन्नईच्या चेपक स्टेडियमवर हा सामना होईल. तर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात रात्री ७.३० वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल.
मागील दोन्ही सामने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने 2 पैकी 1 सामना जिंकला आणि 1 गमावला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांनी 2 पैकी 1 सामना जिंकला आणि 1 गमावला आहे. या दोन्ही संघांची फलंदाजी खूपच मजबूत आहे. आतापर्यंत दिल्ली आणि पंजाब यांच्यात आयपीएलमध्ये एकूण 26 मॅच खेळल्या गेल्या आहेत. त्यापैकी पंजाबने 15 आणि दिल्लीने 11 सामने जिंकले.
खेळपट्टीचा अहवाल :
चेपकची खेळपट्टी स्पिनर्सला उपयुक्त ठरली आहे. या मोसमात फिरकी गोलंदाजांनी या मैदानावर 26 बळी घेतले आहेत. या मैदानावर या हंगामात आतापर्यंत 5 सामने झाले आहेत. त्यात प्रथम फलंदाजी करणार्या संघाने 4 सामने जिंकले तर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने केवळ १ सामना जिंकला.
वानखेडेची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल. 2019 मध्ये वानखेडे येथे 7 सामने खेळले गेले. यापैकी 3 वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 185 च्या वर धावा केल्या. दिल्ली कॅपिटलचा संघ अधिक आक्रमकपणे खेळत आहे आणि येथील खेळपट्टी त्यांच्या खेळाडूंच्या फलंदाजीला अधिक अनुकूल ठरेल, अशी शक्यता आहे. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…