Four women from the same family were raped
मुंबई : सर्वसामान्य महिलांचे रक्षण करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यावरच बलात्काराची घटना मुंबईत घडली आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली असून, पीडितेने सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील डोंगरी पोलीस ठाण्यात पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीच्या आधारे डोंगरी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सहायक पोलीस निरीक्षकाने लग्नाच्या भूलथापा देऊन अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिला अधिकाऱ्याने केला आहे.
पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार, लग्नासंबंधी विचारले असता, आरोपीने स्पष्ट शब्दांत नकार दिला. पीडितेच्या तक्रारीनंतर डोंगरी पोलिसांनी आरोपी सहायक पोलीस निरीक्षक आणि त्याच्या कुटुंबातील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पोलीस अधिकारी हा दक्षिण मुंबईतील एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे, अशी माहिती मिळते. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…