कोरोना

हवेतून कोरोना पसरतो म्हणून घाबरू नका; तज्ज्ञांनी सांगितले, ‘असा’ करा बचाव..

पुणे : कोरोनाचा विषाणू हवेतून फैलावत असल्याचे ‘द लँसेट’ या वैद्यकीय नियतकालिकेत प्रकाशित करण्यात आले आहे. त्यानंतर अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले. मात्र, मॅरिलँड स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. फहीम युनूस यांनी चिंता करण्याची अथवा अनावश्यक भीती बाळगण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे.

डॉ. फहीम यांनी सांगितले की, कोविडचा विषाणू लाळेतील तुषारकण हवेत असल्यामुळे फैलावतो. करोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी कापडी मास्क वापर बंद करण्याची आवश्यकता आहे. N95 किंवा KN95 मास्क खरेदी करण्याचा सल्ला त्यांनी दिला. एका मास्क एकच दिवस वापरावा. वापरलेला मास्क पेपर बॅगेत भरावा आणि दुसऱ्या मास्कचा वापर करावा. दर २४ तासानंतर मास्क बदलून वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला.

डॉ. फहीम यांनी सांगितले की, हवेतून विषाणूचा संसर्ग होतो म्हणजे हवा संसर्गबाधित आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. हवेत विषाणू असू शकतो, इमारतींमध्ये आणखी धोका निर्माण होऊ शकतो. काही बाबींचे पालन केल्यास घरीच राहून संसर्गावर मात करता येऊ शकते. घरातच योग्य पद्धतीने राहिल्यास ८० ते ९० टक्के जण कोरोनावर मात करू शकतात.

काय काळजी घ्याल?

कापडी मास्क वापर बंद करावे, N95 किंवा KN95 मास्क वापरावे. एका मास्क एकच दिवस वापरावा. दररोज तापमान तपासणे, श्वासाचा वेग, हृदयाचे ठोके मोजणे आणि रक्तदाब मोजणे आवश्यक आहे. अनेक स्मार्टफोनमध्ये पल्स ऑग्जिमेंट्री अॅप असते. त्यामध्ये ऑग्ज ९० पेक्षा कमी असल्यास अथवा रक्तदाब ९० सिस्टोलिकपेक्षा खाली आल्यास तर डॉक्टरांशी संपर्क साधवा.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago