क्रीडा

टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्यासाठी ICC ने BCCI ला दिली २८ जूनपर्यंतची मुदत

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) २८ जूनपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. ICC च्या मंगळवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीदरम्यान याविषयी निर्णय घेण्यात आला. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-२० विश्वचषक होणार आहे. मात्र भारतातील कोरोना स्थिती पाहता ही स्पर्धा UAE येथे खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.

ICC ने BCCI ला विश्वचषकाच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी २८ जूनपर्यंतची मुदत दिली आहे. विश्वचषकापूर्वी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर यादरम्यान इंडियन प्रीमियर लीगच्या १४व्या हंगामातील उर्वरित साामने UAE येथे खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे विश्वचषक तेथेच खेळवणे सोयीचे ठरेल, असे जाणकारांचे मत आहे. ऑक्टोबरमध्ये विश्वचषकाचे आयोजन करणे शक्य नसल्यास पुढील वर्षी फेब्रुवारी किंवा जूनमध्ये भारतात ही स्पर्धा खेळवण्याचा पर्याय आहे. मात्र फेब्रुवारीत महिला विश्वचषक आहे, तर जूनमध्ये ‘आयपीएल’संपल्यावर भारतात पावसामुळे काही सामन्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे,’’ असे मत ICC च्या पदाधिकाऱ्यांनी मांडले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago