KKR decision completely wrong
अबुधाबी : RCB च्या गोलंदाजांसमोर अबु धाबीच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी संपूर्णपणे हार पत्करल्याचं पहायला मिळालं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा KKR चा कर्णधार मॉर्गनचा निर्णय पूर्णपणे चुकला. सुरुवातीच्या षटकांपासून KKR च्या डावाला लागलेली गळती थांबवण्यात संघाचे फलंदाज अपयशी ठरले. २० षटकांत संघ अवघ्या ८४ धावांपर्यंत मजल मारु शकला. RCB कडून मोहम्मद सिराजने ३, युजवेंद्र चहलने २ तर नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी ही जोडी मैदानावर आली. परंतू RCB च्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांपासूनच भेदक मारा करत कोलकाता नाईट रायडर्स वर दडपण आणलं. मोहम्मद सिराजने मिळालेल्या संघीचं सोनं करत एकाच षटकात राहुल त्रिपाठी आणि नितीश राणा यांना बाद केलं. शुबमन गिल देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मैदानावर फटकेबाजी करु पाहणाऱ्या टॉम बँटनलाही सिराजने बाद केलं.
मोहम्मद सिराजने एकाच सामन्यात दोन षटकं निर्धाव टाकून ३ बळी घेत आयपीएलच्या इतिहासात विक्रमाची नोंद केली. फलंदाजीसाठी कर्णधारपद सोडलेला दिनेश कार्तिकही फारशी चमक दाखवू शकला नाही. युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर १४ चेंडूत ४ धावा काढत तो माघारी परतला. चहलनेच पॅट कमिन्सला देवदत पडीकलकरवी झेलबाद करत माघारी धाडलं. KKR चा कर्णधार मॉर्गन एक बाजू सांभाळून होता…परंतू समोरच्या फलंदाजांकडून सपोर्ट मिळत नसल्यामुळे फटकेबाजीच्या प्रयत्नात त्यानेही आपली विकेट फेकली. कुलदीप यादव आणि लॉकी फर्ग्युसन यांनी अखेरच्या षटकांत पडझड रोखत संघाला ८४ धावांचा टप्पा गाठून दिला.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…