IPL 2020: Bangalore beat Kolkata by 8 wickets
IPL 2020 : टॉस जिंकून मैदानात बॅटिंगसाठी उतरलेल्या कोलकाताच्या टीमला 20 ओव्हर्समध्ये अवघे 84 रन्स करता आले. बंगळुरूने ही मॅच अगदी सहज जिंकली. कोलकाताने दिलेलं आव्हान बंगळुरूच्या टीमने 8 विकेट्स राखून 13.3 ओव्हर्समध्ये गाठलं आणि विजय मिळवला. मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भेदक मारा करत KKR ची दाणादाण उडवली.
८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना RCB च्या फलंदाजांनी आश्वासक सुरुवात केली. फिंच आणि देवदत पडीकल यांनी पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागादारी केली. फलंदाजीत निराशाजनक कामगिरी केलेल्या KKR च्या संघाने गोलंदाजीतही फारशी चमक दाखवली नाही. मागच्या सामन्यात गोलंदाजीत चमक दाखवलेल्या लॉकी फर्ग्युसनला पॉवरप्ले नंतर गोलंदाजीची संधी दिली. फर्ग्युसनने संधी मिळताच फिंचला माघारी धाडत RCB ला पहिला धक्का दिला. देवदत पडीकलही धावबाद होऊन माघारी परतला. यानंतर विराट कोहली आणि गुरकिरत मान यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
KKR चा कर्णधार मॉर्गनचा निर्णय पूर्णपणे चुकला, RCB च्या गोलंदाजांपुढे KKR चं पानिपत
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…