तंत्रज्ञान

Audi Q2 SUV : Audi ने भारतात लॉन्च केली आपली सर्वात स्वस्त SUV कार

जगभरातील सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक असणाऱ्या Audi ने भारतात आपली सर्वात स्वस्त कार लॉन्च केली आहे. कंपनीने Audi Q2 ला भारतीय बाजारात उतरवलं आहे. ऑडीच्या या स्वस्त मॉडेलची किंमत 34.99 लाख रुपये आहे. ऑडीची ही कार स्टँडर्ड, प्रीमियम, प्रीमियम प्लस I, प्रीमियम प्लस II आणि टेक्नॉलॉजी ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे. एक्स्टीरियर लाइन आणि डिझाइन लाइन ग्रेड्समध्ये येते.

फिचर्स :

  1. ऑडीच्या या कारमध्ये ऑडी वर्च्युअल कॉकपिट देण्यात आलं आहे.
  2. कारमध्ये 12.3 इंचाचा MMI नेव्हिगेशन, ड्यूअल झोन क्लायमेट कंट्रोल, 8.3 इंच डिस्प्ले, सनप्रूफ, एंबिएंट लायटनिंग, LED हेडलाइट आणि रिवर्स कॅमेरा यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
  3. यामध्ये 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनही देण्यात आलं आहे. जे 190PS पॉवर 320Nm टॉर्क जेनरेट करतं.
  4. Audi Q2 मध्ये 7 स्पीड ड्यूअल क्लच ऑटोमॅटिक गियरबॉक्स आणि ऑल व्हिल ड्राइव्ह देण्यात आलं आहे.
  5. ही कार केवळ 6.5 सेकंदांमध्ये 0- 100kmpl च्या वेगाने धावते. ही कंपनीची एन्ट्री लेव्हल एसयूव्ही (SUV) कार आहे. ही कार फॉक्सवॅगनच्या MQB प्लेटफॉर्मवर बेस्ड आहे.
  6. कारची लांबी 4191 मिमी आणि रुंदी 1,794 मिमी आहे. कारची हाइट 1,508mm आहे. व्हिलबेस 2,601mm आहे.

Audi च्या या गाडीची किंमत 34.99 लाख रुपयांपासून सुरु होते. आणि याच्या टॉप मॉडेलची किंमत 48.99 लाख रुपये आहे. या कारसाठी बुकिंग्स सुरु करण्यात आल्या आहेत. दोन लाख रुपयांच्या टोकन अमाउंटवर तुम्ही ही गाडी बुक करू शकता.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago