क्रीडा

IPL 2020 : आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना

आयपीएलचा 40 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये संध्याकाळी ७.30 वा. रंगणार आहे. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघांसाठी विजय अत्यावश्यक आहे. हैदराबाद आतापर्यंत नऊ सामने खेळला आहे. पॉईंट टेबलमध्ये सामन्यांत सहा गुण मिळवून सातव्या स्थानावर आहे. तर राजस्थान 1o सामन्यांत आठ गुण मिळवून सहाव्या स्थानावर आहे.

मागील सामन्यात राजस्थानने हैदराबादला 5 गडी राखून पराभूत केले. हैदराबादने प्रथम फलंदाजी करत 4 विकेट्सवर 158 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने 5 गडी राखून १९.५ षटकांत सामना जिंकला.

राजस्थान रॉयल्स संघात जोस बटलर, स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरसारखे उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबाद संघात डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, जेसन होल्डर आणि राशिद खान सारखे खेळाडू आहेत. मात्र हैदराबादच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार फलंदाज केन विल्यमसन राजस्थान रॉयल्सच्या विरोधातील सामना खेळणार नाही.

दुबईतील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकेल. येथे स्लो विकेट असल्याने स्पिनर्सनाही खूप मदत होईल. दुबईमध्ये नाणेफेक जिंकलेल्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

5 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago