क्रीडा

पीव्ही सिंधूने मिळवले सुवर्णपदक, राष्ट्रकुल स्पर्धेत दमदार कामगिरी

बर्मिंगहम : भारताची अव्वल बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूने भारताला सुवर्णपदक जिंकवून दिले. यापूर्वी सिंधूने २०१४ साली राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते, तर २०१८ साली रौप्यपदकाची कमाई केली होती. त्यामुळे तिचे हे राष्ट्रकुलमधील पहिले सुवर्णपदक होते. या सामन्यात पहिला गेम सिंधूने २१-१५ असा जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या गेममध्येही तिने दमदार कामगिरी केली आणि जेतेपद पटकावले.

सिंधूने पहिल्या गेममध्ये आघाडी घेतली होती. सिंधूने त्यानंतर १-१ अशी बरोबरी केली. त्यानंतर सिंधूने ३-१ आणि ४-२ अशी आघाडी कायम ठेवली होती. पण त्यानंतर मिचेलने काही पॉइंट्स कमावत सिंधूच्या जवळ येण्याच्या प्रयत्न केला होता. पण सिंधूने तरीही ७-६ अशी आघाडी ठेवली होती. त्यानंतर सिंधूने आक्रमक खेळ केला आणि १५-९ अशी मोठी आघाडी पहिल्या गेममध्ये मिळवली होती. सिंधूने ही आघाडी १९-१५ अशी वाढवली आणि त्यानंतर पहिला गेम जिंकला.

सिंधूचा सामना हा कॅनडाच्या मिचेल लीबरोबर होणार होता. यापूर्वी सिंधूने सिंगापूर आणि मलेशियाच्या खेळाडूंना पराभूत केले होते. त्यामुळे तिच्याकडून यावेळी सुवर्णपदकाची अपेक्षा होती. सध्याच्या घडीला सिंधू ही चांगल्या फॉर्मात आहे. कारण या स्पर्धेपूर्वी सिंधूने सिंगापूर खुली स्पर्धा जिंकली होती. त्याचबरोबर यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेत ध्वजवाहक होण्याचा दुसऱ्यांदा मानही सिंधूला मिळाला होता. या स्पर्धेत भारताच्या संघाकडून खेळताना सिंधूने चांगली कामगिरी केली होती.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago