मुंबई

मोठी बातमी! संजय राऊत यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊत यांना सुनावण्यात आलेली ईडीची कोठडी आज संपली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी ईडीकडून संजय राऊत यांची पत्राचाळ प्रकरणात चौकशीसाठी आणखी ईडीच्या कोठडीची मागणी केली नाही. त्यामुळे न्यायालयाने राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

३१ जुलै रोजी अनेक तासांच्या चौकशीनंतर राऊतांना ईडीने अटक केली होती. न्यायालयाने राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. राऊतांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ केली. आज सुनावणी झाली असता त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शनिवारी वर्षा राऊत यांचीही जवळपास १० तास ईडीकडून चौकशी झाली.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना न्यायालयाने २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे संजय राऊतांचा यापुढील मुक्काम आता मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात असणार आहे. दरम्यान, संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे आता जामीनासाठी अर्ज करता येणार आहे. संजय राऊत यांच्या वकिलांनाकडून यावेळी न्यायालयीन कोठडीतही संजय राऊत यांना ईडीच्या कोठडीप्रमाणेच घरचं जेवण, औषधं घेण्याची परवानगी आणि हवेशीर खोली दिली जावी अशी मागणी केली. त्यावर कोर्टानं याबाबत आर्थर रोड तुरुंग प्रशासनाशी बोलून घेण्यास सांगितलं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago