क्रीडा

दिल्ली, बँगलोरच्या सामन्याला उपांत्यपूर्व फेरीचेच स्वरूप, विजयी संघ द्वितीय स्थानी; जाणून घेऊयात संघांविषयी

अबू धाबी : बेंगळूरु आणि दिल्ली यांच्यात आज होणाऱ्या ‘आयपीएल’ लढतीत विजयी प्ले-ऑफ आपले स्थान पक्के करेल ,संघांदरम्यानच्या लढतीला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. कारण हरणाऱ्या संघाचा बाद फेरीचा मार्ग बिकट होऊ शकेल. परिणामी पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येऊ शकेल किंवा बिकट होईल.या

आयपीएल’च्या पूर्वार्धात दिमाखदार प्रारंभ करणाऱ्या बेंगळूरु आणि दिल्ली या दोन्ही संघांनी मागील अनुक्रमे चार आणि तीन सामने गमावले आहेत. त्यामुळेच आजच्या सामन्याला उपांत्यपूर्व फेरीचेच स्वरूप प्राप्त झाले आहे. सलामीच्या स्थानांसाठीचे अस्थर्य ही दिल्लीची प्रमुख चिंता आहे. शिखर धवनला पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे हे दोघेही तोलामोलाची साथ देऊ शकलेले नाही. धवनने दोन सलग शतकांनिशी सूर गवसल्याची ग्वाही दिली, पण मागील तीन सामन्यांत तो अनुक्रमे ०, ० आणि ६ धावांवर झगडताना आढळला आहे.

मजबूत बाजू :

  1. दिल्ली : धवन, श्रेयस अय्यर व ऋषभ पंत यांच्या समावेशामुळे फलंदाजी मजबूत. रबाडा भेदक मारा करण्यास सक्षम.
  2. बँगलोर : कोहली, डिव्हिलियर्स यांच्या समावेशामुळे फलंदाजी मजबूत. फिरकीपटू चहल व वाॅशिंग्टन सुंदर प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास सक्षम.

कमजोर बाजू

  1. दिल्ली : नियमित सलामी जोडीचा अभाव. पृथ्वी शॉ व अजिंक्य राहणे यांनी धवनसोबत सलामीला जोडी बनविली, पण त्यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. धवन गेल्या तीन सामन्यात अपयशी. मधली फळीही विशेष यशस्वी ठरली नाही.
  2. बँगलोर : कोहली व डिव्हिलियर्स गेल्या दोन लढतींमध्ये अपयशी.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago