मनोरंजन

प्रतीक्षा संपली : सुबोध भावेंची ‘चंद्र आहे साक्षीला’ ११ नोव्हेंबरपासून कलर्स मराठी वाहिनीवर

मुंबई : अभिनेता सुबोधच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सुबोध छोट्या पडद्यावर परततोय. तुला पाहते रे या मालिकेनंतर सुबोध ब-याच कालावधीपासून छोट्या पडद्यावर दिसला नाही. मात्र 11 नोव्हेंबरपासून त्याची नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत असून चंद्र आहे साक्षीला हे या मालिकेचे नाव आहे. सुबोधने मालिकेचा टीझर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्यासह त्याने लिहिले, मालिकांशी जोडलेली नाळ कधी तुटली नाही, पुन्हा एका नव्या रुपात तुमच्या समोर येतोय, #चंद्रआहेसाक्षीला, लवकरच.’

नव्या मालिकेविषयी आणि सुबोधच्या कमबॅकविषयी निखिल साने म्हणतात, सुरुवात झाली एका चित्रपटाने ‘आणि डॅा. काशिनाथ घाणेकर’… मग नाटक ‘अश्रुंची झाली फुले’ आणि आता नवी मालिका! या सगळ्यातील महत्वाचा, समान धागा म्हणजे सुबोध भावे! आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे की ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेद्वारे कलर्स मराठीवर एका दैनंदिन मालिकेच्या माध्यमातून सुबोधचे पदार्पण होत आहे. येत्या दिवाळीच्या शुभमुहुर्तावर या नव्याकोऱ्या मालिकेचे आगमन होत आहे. सुबोध.. या सर्व प्रवासासाठी तुझे मनापासून आभार आणि खूप खूप शुभेच्छा!

काही दिवसांपूर्वीच सुबोधने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका पाठमो-या व्यक्तीचे पोस्टर शेअर केले होते. त्यात पार्श्वभूमीवर चंद्र होता. एक ऑफलाईन धक्का, असे कॅप्शन सुबोधने या पोस्टला दिले होते. त्यामुळे त्याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली होती. पण आता हि नवी मालिका ‘चंद्र आहे साक्षीला’ कलर्स मराठी वाहिनीवर ११ नोव्हेंबर सुरु होणार आहे.

 

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago