क्रीडा

DC vs SRH दिल्लीचा विजय; अंतिम सामन्यात मुंबईशी भिडणार

अबुधाबी : आयपीएलच्या क्वालिफायर 2 मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा विजय झाला. आता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स अशी फायनल होणार आहे. शिखर धवनची अर्धशतकी खेळी आणि शिमरॉन हेटमायरच्या फटकेबाजीच्या आधारावर दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 190 धावांचे आव्हान दिले. दिल्लीने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 189 धावा केल्या.

दिल्लीकडून शिखर धवनने 78 धावांची खेळी केली.  मार्कस स्टॉयनीसने 38 धावांची खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यरने 21 धावा केल्या. शिमरॉनने 42 धावा केल्या. मार्कस स्टॉयनीसने अष्टपैलू कामगिरी केली. आता १० नोव्हेंबरला अंतिम सामन्यात दिल्लीपुढे मुंबईचे आव्हान असणार आहे. मार्कस स्टोइनिस मॅन ऑफ द मॅच झाला. त्याने दिल्लीकडून फलंदाजी करताना २७ चेंडूत ३० धावा केल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार होता. तसेच गोलंदाजी करताना ३ ओव्हरमध्ये २६ धावा देत सलामीवीर प्रियम गर्ग, मनिष पांडे आणि अर्धशतकवीर केन विल्यमसन या तिघांना बाद केले.

१९० धावांच्या पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर २ धावांवर त्रिफळाचीत झाला. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या प्रियम गर्ग (१७) आणि मनिष पांडे (२१) या दोघांना स्टॉयनीसने एका षटकात माघारी पाठवले. अनुभवी जेसन होल्डर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ११ धावांवर बाद झाला. युवा अब्दुल समदसह महत्वपूर्ण भागीदारी करत विल्यमसनने अर्धशतक पूर्ण केलं. पण त्याचे प्रयत्न तोकडे पडले. सनरायजर्स हैदराबाद २० ओव्हरमध्ये ८ बाद १७२ धावा करू शकले. यामुळे क्वालिफायर टू मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा १७ धावांनी विजय झाला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago