Chennai Super Kings
नवी दिल्ली : IPL 2021 च्या १४व्या हंगामातील बायो बबलच्या वातावरणात कोरोनाचा शिरकाव झालेला बघायला मिळत आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. यात CSK संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एक बस क्लीनरचा समावेश आहे.
अहमदाबाद येथे असलेल्या कोलकाता नाइट रायडर्स संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता चेन्नईच्या संघात कोरोना रुग्ण सापडल्यामुळे खळबळ माजली आहे. दरम्यान, कासी विश्वनाथ आणि बालाजी हे शनिवारी झालेल्या सामन्याच्या वेळी खेळाडूंसोबत डगआऊटमध्ये उपस्थित होते. कोरोना रुग्ण आढळल्यामुळे चेन्नई संघाचा सराव देखील बंद ठेवण्यात आला आहे. संघातील बाकी सर्वांची कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…