कोरोना

रेमडेसिवीर: विखे यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज, व्हीडिओ चित्रित करण्याचा नाटकीपणा करायला नको होता, हायकोर्टाने सुनावले

औरंगाबाद: एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी गैरमार्गाचा वापर झाला असेल तर त्या कृतीमागचा हेतू हा कधीच शुद्ध राहत नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर ताशेरे ओढले. डॉ. सुजय विखे यांनी परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा खरेदी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

डॉ. सुजय विखे यांचे वकिल म्हटले की, माझ्या अशिलाची कृती ही कोणत्याही अंगाने गुन्हेगारी प्रकारात मोडत नाही. लोकांची मदत करण्यासाठी त्यांनी चार्टर्ड विमानाने परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन्स आणली. मला मान्य आहे की, हे फाजील धाडस होते, पण हा गुन्हा ठरत नाही ते पुढे म्हटले कि सुजय विखे हे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. ते एक न्यूरोसर्जन आहेत. त्यांचे डॉ. विखे-पाटील स्मृती रुग्णालय एका रात्रीत मोठी झालेली संस्था आहे, असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न होत आहे, असा बचाव सुजय विखेंच्या वकिलांनी केला. डॉ. सुजय विखे यांच्या वकिलांनी म्हटले.

त्या वर न्यायमूर्ती म्हणाले कि,  तुमच्या अशिलाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विमानातून उतरल्यानंतर रेमडेसिविर इंजेक्शन्स उतरवताना व्हीडिओ चित्रित करण्याचा नाटकीपणा त्यांनी करायला नको होता. मतदारसंघांमधील लोकांसाठी मी कशाप्रकारे स्वत:चे वजन वापरून दिल्लीतून इंजेक्शन्स आणली, हे सांगण्याचा दिखाऊपणा त्यांनी टाळायला पाहिजे होता, असे न्यायमूर्ती घुगे यांनी म्हटले.

सुनावणीदरम्यान डॉ. सुजय विखे यांनी 10 हजार नव्हे तर फक्त 1200 इंजेक्शन्स आणल्याचे स्पष्ट करण्यात आले. सुजय विखे यांच्या चार्टर्ड विमानात 15 बॉक्स होते. त्यामध्ये 1200 इंजेक्शन्स होती. अहमदनगरमधील एका डॉक्टरने पुण्यातील एका कंपनीकडे रेमडेसिव्हिरच्या 1700 कुप्यांसाठी ऑर्डर बुक केली होती. यापैकी 500 कुप्या त्याला मिळाल्या होत्या. उर्वरित 1200 कुप्यांसाठी डॉ. पाटील फाऊंडेशनने त्याला 18,14,400 रुपये देऊन तो साठा विकत घेतला. त्यानंतर डॉ.  सुजय विखे यांनी संबंधित कंपनीच्या चंदीगढ येथील युनिटवर जाऊन रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा नगरमध्ये आणला, असे न्यायालयासमोर सांगण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार असून त्यावेळी हा खटला फौजदारी असणार की नाही, याचा निर्णय घेतला जाईल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago