उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान (७२) यांचे निधन झाले. त्यांना कोरोना झाला होता. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होती. त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे ते व्हेंटिलेटवर होते.
चौहान एक उत्तम क्रिकेटपटू होते. ते भारताकडून ४० आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले होते. सुनिल गावसकर यांच्यासोबत सलामीला येणारे चेतन चौहान फलंदाज आणि गोलंदाज म्हणून भारतीय संघातले महत्त्वाचे खेळाडू होते. दिल्ली क्रिकेट बोर्डात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, निवड समिती अध्यक्ष तसेच एका ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ते भारतीय संघाचे मॅनेजर होते.
चौहान यांच्याकडे उत्तर प्रदेश सरकारचे सैनिक कल्याण, होमगार्ड, पीआरडी आणि नागरिक सुरक्षा मंत्रालय होते. त्यांना १९ जुलै रोजी कोरोना झाल्याचे लक्षात आले. कोरोना झाल्यामुळे त्यांना संजय गांधी पोस्टग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स येथे ठेवले होते. तब्येत खालावल्यामुळे चौहान यांना गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र चौहान यांची प्रकृती सातत्याने खालावत होती. चेतन चौहान आधी भाजपच्या तिकिटावर लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले होते. मागच्यावर्षी पर्यंत ते उत्तर प्रदेश सरकारमध्ये क्रीडामंत्री होते. वयोमान आणि कोरोना तसेच किडनी आणि रक्तदाबाच्या त्रासामुळे त्यांची तब्येत एकदम खालावली.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…