मनोरंजन

सुशांतच्या घराजवळ आढळलेल्या २ अज्ञातांचा शोध सुरू

सुशांतच्या मृत्यू नंतर मुंबई पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. काही पोलीस सुशांतच्या घरात तर काही पोलीस सुशांतचे घर ज्या इमारतीत होते त्या इमारतीच्या परिसरात उभे होते. पोलीस उपस्थित असताना दोन अज्ञात व्यक्ती इमारतीच्या परिसरात आढळल्या. या व्यक्तींपैकी एक महिला आहे आणि दुसरा पुरुष आहे. या दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. सुशांतच्या मृत्यूनंतर या दोन अज्ञातांमध्ये चर्चा झाली. महत्त्वाचे म्हणजे अज्ञात पुरुष इमारतीत गेला आणि काही वेळानंतर एक काळी पिशवी घेऊन बाहेर आला. पोलिसांच्या समोरुन हा पुरुष ती पिशवी इमारतीबाहेर घेऊन गेला. थोडया वेळाने तो पुरुष इमारतीच्या आवारात पुन्हा आला पण यावेळी त्याच्या हाती काळी पिशवी नव्हती. इमारतीत हा अज्ञात पुरुष कोणाच्या घरात गेला आणि काळ्या पिशवीतून त्याने इमारतीबाहेर काय नेले यावरुन तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

सुशांत ज्या इमारतीत राहात होता तिथल्या कोणत्याही व्यक्तीने तसेच सुशांतच्या नातलगांपैकी कोणीही अद्याप कॅमेऱ्यात दिसलेल्या अज्ञात पुरुष आणि महिलेला ओळखू शकलेले नाही. त्यामुळे अज्ञातांनी सुशांत प्रकरणाशी संबंधित काही पुरावे नष्ट केले आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबई पोलिसांनी व्हिडीओत आढळलेल्या अज्ञातांविषयी मौन पाळले आहे.

सुशांतचा डेथ रिपोर्ट नोंदवणाऱ्या मुंबई पोलिसांनी त्याच्या मृत्यूची वेळ नोंदवलेली नाही. या मुद्यावरुन सुशांतच्या वडिलांच्या वकिलाने संशय व्यक्त केला आहे. वेळेचा मुद्दा कोर्टात उपस्थित करणार असल्याचे वकिलाने सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago