महाराष्ट्र

कुऱ्हाडीचे वार करून काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा ऊसरे यांची हत्या

काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा ऊसरे यांची आज सकाळी दोन अज्ञात तरुणांनी कुऱ्हाडीचे वार करून हत्या केली. ऊसरे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आल्याने नागपूर हादरून गेले आहे.

देवा ऊसरे हे नागपूर येथील गड्डीगोदाम येथे राहतात. ते आज सकाळी नेहमीप्रमाणे बाहेर चहाच्या टपरीवर आले होते. यावेळी त्यांनी टपरी शेजारच्या रुग्णालयाजवळ दुचाकी लावली आणि मागे वळत नाही तोच दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. कुऱ्हाडीचे जोरदार घाव बसल्याने ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ऊसरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा बराच मोठा परिवार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago