Categories: इतर

नागपूर शहरातील प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करा, पालकमंत्री नितीन राऊत यांचे निर्देश

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत येणाऱ्या प्रलंबित विकास कामांना गती देण्याचे निर्देश आज राज्याचे ऊर्जा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले. वैशाली नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे पुनर्निर्माण व सौंदर्यीकरण सादरीकरणामध्ये देखील आज त्यांनी दुरुस्त्या सुचविल्या.

या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान वैशाली नगर नागपूर सौंदर्यीकरण व नूतनीकरण प्रकल्प सादरीकरण करण्यात आले. यामध्ये अनेक सूचना करण्यात आल्या. सर्व वयोगटातील नागरिकांचे या ठिकाणी मनोरंजन व्हावे. सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जागतिक स्तराच्या मानकांना वापरून नूतनीकरण व सौंदर्यीकरण करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. नागपूर सुधार प्रन्यापस कार्यालयामध्ये आज झालेल्या बैठकीला नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, महाव्यवस्थापक निशिकांत सुके, विभागीय अभियंत्या लीना उपाध्याय, कार्यकारी अभियंता एस. एम. पोहेकर, विभागीय अधिकारी पंकज आंभोरकर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

याशिवाय या बैठकीत इंदोरा भागातील पट्टे वाटप, पाहुणे लेआऊट येथील आरक्षण हटविणे, हजरत बाबा ताजुद्दीन परिसरातील सौंदर्यीकरण, वांजरी उत्तर नागपूर या परिसरात वीटभट्टीची जागा उपलब्ध करून देणे, अतिक्रमणाबाबत कामठी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर बांधकाम पूर्ण करण्याबाबत, कांजी हाऊस चौक ते बारानल चौक अतिक्रमणे हटविण्याबाबत, डब्ल्यूसीएल कार्यालय कबीर नगर चौक ते बाजार चौक सिमेंट काँक्रिटीकरण करण्याबाबत, कळमना पोलीस चौकी ते वांजरा पर्यंत सिमेंट रोड, कोराडी रोड पासून नारा मार्गे कळमना पर्यंत प्रस्तावित कॅनल रोड, संन्याल नगर नारी रोड सन्मान विहाराच्या मागील बाजूला वॉल कंपाउंड तयार करणे, उत्तर नागपूर क्षेत्र अंतर्गत डीपीआर तयार करणे, कोराडी येथे ऊर्जा पार्क विकसित करणे, आदी विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago