देश

प्रियकराने प्रेयसीला चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले, 2 दिवसांनी ती शुद्धीवर आली आणि…

बिहार : बिहारमधील नालंदा येथे एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. स्थानिक लोकांनी तिला बेशुद्धावस्थेत आणि गंभीर जखमी झालेली पाहिल्यानंतर उपचारासाठी बिहारशरीफ सदर रुग्णालयात दाखल केले, तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना नालंदाच्या भगन बिघा रेल्वे ट्रॅकच्या बाजूला घडली आहे.

दरम्यान, दोन दिवसांच्या उपचारानंतर जखमी मुलगी शुद्धीवर आली आणि त्यानंतर तिची ओळख पटली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच नातेवाइकांनी तेथे पोहोचून संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलीस तपास सुरु झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी पाटणा शहरातील रहिवासी आहे. 4 महिन्यांपूर्वी ही मुलगी तिच्या शेजारी राहणाऱ्या मणिकुमारच्या प्रेमात पडली होती. काही दिवस दोघेही एकमेकांना गुपचूप भेटत राहिले. त्यानंतर एके दिवशी लग्न करण्याच्या इराद्याने दोघेही हरियाणाला पळून गेले होते. दरम्यान, मुलीच्या घरच्यांना हा प्रकार कळताच त्यांनी मुलाच्या घरच्यांशी लग्नासाठी बोलणे केले, त्यानंतर त्यांनी होकार दिला. याबाबत गावात पंचायतही बसली. तेथेही मुलाच्या कुटुंबीयांनी मणिकुमार तिला स्वीकारणार असल्याचे सांगितले आणि दोघांनाही घरी बोलावले. त्यानंतर 10 तारखेला मणिकुमारने तिला राजगीरला घेऊन जातो, असे सांगून घर सोडले. मात्र, ट्रेनमध्ये दोघांमध्ये भांडण झाले, त्यानंतर प्रियकराने तरुणीला चालत्या ट्रेनमधून ढकलून दिले आणि पळ काढला.

स्थानिक लोकांनी रेल्वे रुळावर तरुणी पडल्याचे आणि ती गंभीर जखमी झालेली पाहिल्यानंतर 112 आपत्कालीन सेवेला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी सदर हॉस्पिटल बिहार शरीफ येथे मुलीला उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी मुलीची प्रकृती बिघडली होती. 2 दिवसांनी शुद्धीवर आल्यावर नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली.

सदर घटनेबाबत पोलीस म्हणाले की, १० जून रोजी भगन बिघा रेल्वे रुळावर एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली होती, तिला पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने सदर रुग्णालयात दाखल केले. प्रेमप्रकरणातून मुलीला ट्रेनमधून ढकलल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपी प्रियकराचा शोध घेतल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होईल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago