देश

पाळीव श्वानाची हत्या करणं मालकिणीला भोवलं; काहीच वेळात महिलेनं स्वतःही गमावला जीव…

लखनऊ  : उत्तर प्रदेशातील लखनऊमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका पाळीव कुत्र्याने स्वतःच्या मालकिणीलाच चावा घेतला. कुत्र्याच्या चाव्यामुळे मालकिणीला इतका राग आला की तिने कुत्र्याला निर्दयीपणे मारलं. त्यानंतर ती कुत्र्याचा मृतदेह तलावात टाकण्यासाठी गेली असता ती स्वत:ही पाण्यात बुडाली. यामुळे महिलेचा मृत्यू झाला.

पोलिसांनी कुत्र्याचा मृतदेह आणि मालकिणीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण लखनऊच्या पीजीआय पोलीस स्टेशन क्षेत्रातील दलोना गावाशी संबंधित आहे. येथे रुबी नावाची महिला पती आणि दोन मुलांसोबत राहत होती. त्यांचा पाळीव कुत्राही त्यांच्यासोबत येथे राहत होता.

पाळीव कुत्र्याने शनिवारी रुबीला चावा घेतला. याआधीही कुत्र्याने त्यांच्या मुलाला चावा घेतला होता. कुत्र्याच्या या कृत्यामुळे रुबीला राग आला. त्यानंतर तिने कुत्र्याची हत्या केली. त्यानंतर ती कुत्र्याचा मृतदेह फेकण्यासाठी घराजवळील तलावाजवळ गेली. बराच वेळ होऊनही रुबी घरी न परतल्याने पती तिला पाहण्यासाठी तलावाकडे गेला.

पतीने तलावाजवळ रुबीची चप्पल पाहिली. त्यांनी तातडीने गावकऱ्यांकडे मदत मागितली. ग्रामस्थांनी रुबीचा शोध सुरू केला असता त्यांना रुबीचा मृतदेह तलावात तरंगताना दिसला. तात्काळ गावातील काही लोकांनी मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनाही कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

पतीचा जबाब घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. पूर्व विभागाचे एडीसीपी सय्यद अली अब्बास यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

5 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago