देश

नवऱ्याला घाबरवण्यासाठी करत होती गळफास घेण्याचे नाटक, पण पाय घसरला आणि…

नवऱ्याला घाबरवण्यासाठी गळफास घेण्याचे नाटक करताना एका महिलेचा मृत्यू झाला. झारखंडमधील धनबादमध्ये रामकनाली फिल्टर प्लान्टच्या जवळच ही धक्कादायक घटना घडली. महिलेच्या आठ वर्षीय मुलीने सांगितले की तिची आई गळफास घेण्याचे नाटक करत होती. गळफास घेतानाचा फोटो काढत असताना स्टुलावरून तिचा पाय घसरला. त्यामुळे, फास आवळून तिचा यात दुर्दैवी मृत्यू झाला.

मनोज महतोचे हे दुसरे लग्न होते आणि ताराचेही दुसरे लग्न होते. तिने कुटुंबीयांचा विरोध असूनही हे लग्न केले होते. मनोजची एक आठ वर्षांची मुलगी आहे. ती मनोज आणि तारा यांच्यासोबतच राहत होती. या मुलीने सांगितले कि, “आईने सांगितले होते की वडिलांना भीती घालण्यासाठी गळफास घेण्याचे नाटक करणार आहे. गळफास घेतानाचा फोटो काढून वडिलांना पाठवू आणि घाबरवू. पण नाटक करताना आईचा खरंच स्टुलावरून पाय घसरला.”

या अनपेक्षित प्रकारानंतर या महिलेची मुलगी प्रचंड घाबरली. तिने बाहेर जाऊन आरडाओरड करत मदतीसाठी काही जणांना बोलावले. पण तोपर्यंत तिच्या आईचा मृत्यू झाला होता. दरम्यान, काही जणांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago