मुंबई

मोठी बातमी : सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ, पोलीस सेवेतून दुसऱ्यांदा निलंबित

मुंबई : सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना पोलीस सेवेतून दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आलं आहे. मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी NIA नं शनिवारी रात्री वाझे यांना अटक केली. त्यांच्याविरोधात NIA कडे भक्कम पुरावे असल्याची चर्चा आहे. आता वाझेंचं पुन्हा एकदा पोलीस सेवेतून निलंबन करण्यात आलं आहे.

पहिल्यांदा १६ वर्षांपूर्वी ख्वाजा युनुस मृत्यू प्रकरणात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. मुंबईतील घाटकोपर येथील बॉम्ब स्फोट प्रकरणात २५ डिसेंबर २००२ रोजी ख्वाजा युनूस याला अटक झाली होती. त्यानंतर तो फरार झाल्याचं पोलीसांनी सांगितलं होतं. मात्र, ख्वाजाच्या नातेवाईकांनी पोलीस कोठडीत त्याचा छळ झाल्याने मृत्यू झाल्याचा आणि नंतर पोलिसांनी हा बनाव रचल्याचा आरोप केला होता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार सचिन वाझे यांच्यासह चार अधिकाऱ्यांना ३ मार्च २००४ रोजी निलंबित करण्यात आले होते. परंतु, १६ वर्षांनंतर ६ जून २०२० रोजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आदेशानुसार सचिन वाझे यांच्यासह चारही अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत दाखल करुन घेण्यात आले होते.

आता अँटिलिया स्फोटक प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. NIA नं शनिवारी रात्री वाझे यांना अटक केली. भारतीय दंड विधानाच्या २८६, ४६५, ४७३, ५०६ (२), १२० ब आणि ४ (अ) (ब) (इ) तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ अन्वये वाझेंवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता त्यांच्यावर पुन्हा एकदा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago