देश

‘आई व्हायचं आहे, नवऱ्याला पॅरोल द्या’, पत्नीच्या याचिकेवर न्यायालयाने दिला ऐतिहासिक निकाल

राजस्थान : उच्च न्यायालयाने राजस्थानमधील महिलेच्या याचिकेवर सुनावणी करत तिच्या पतीला पॅरोल मंजूर केला. महिलेने असा युक्तिवाद केला होता की तिला आई व्हायचे आहे आणि तिचा नवरा तुरुंगात आहे. अशा परिस्थितीत आई होण्याचा तिचा हक्क लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने महिलेच्या पतीला पॅरोल मंजूर केला.

भिलवाडा जिल्ह्यातील एक व्यक्ती फेब्रुवारी 2019 पासून अजमेर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. नंदलाल नावाच्या या व्यक्तीला शिक्षा झाली, त्याच्या काही काळापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. दरम्यान, नंदलालला काही काळ पॅरोल मंजूर करण्याची विनंती पत्नीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यानंतर महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली.

महिलेने उच्च न्यायालयात काय सांगितले?
जोधपूर उच्च न्यायालयात महिलेने सांगितले की, तिचा पती तुरुंगातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहे. तो व्यावसायिक गुन्हेगारही नाही, त्यामुळे त्याची वागणूक बघून आणि माझ्या हक्काची जाणीव ठेवून त्याला १५ दिवसांचा पॅरोल द्यावा.

न्यायालयाने पॅरोल मंजूर केला
न्यायमूर्ती संदीप मेहता आणि फर्जंद अली यांच्या खंडपीठाने या प्रकरणी सांगितले की, मुलाच्या जन्मासाठी पॅरोलशी संबंधित कोणताही स्पष्ट नियम नसला तरी वंशाच्या संरक्षणासाठी मूल जन्माला येणे आवश्यक आहे. ऋग्वेद आणि वैदिल कालखंडाचा दाखला घेत न्यायालयाने म्हटले की, संततीचा जन्म हा मूलभूत अधिकार असल्याचा उल्लेख करताना ‘विवाहित जीवनासंदर्भात पत्नीच्या लैंगिक आणि भावनिक गरजांचे रक्षण करण्यासाठी’ १५ दिवसांचा पॅरोल मंजूर केला जात आहे. हिंदू संस्कृतीत धार्मिक आधारावर गर्भधारणा हा 16 संस्कारांपैकी एक आहे, त्यामुळे या आधारावरही परवानगी दिली जाऊ शकते, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

5 दिवस ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 महिने ago