देश

आणखी एक विमान दुर्घटना टळली! इंजिन निकामी झाल्याने विस्तारा विमानाचे सिंगल इंजिनसह लँडिंग

दिल्ली : विमानात बिघाड झाल्याची प्रकरणे देशात सातत्याने समोर येत आहेत. मंगळवार 5 जुलै रोजी, बँकॉक-दिल्ली विस्तारा फ्लाइट – FLT UK-122 (BKK-DEL) सिंगल इंजिनसह दिल्ली विमानतळावर उतरले. त्यानंतर हे विमान पार्किंग बेमध्ये हलवण्यात आले. या संदर्भात एटीसीला माहिती देण्यात आली आणि प्रकरण डीजीसीएलाही कळवण्यात आले.

विस्ताराच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमच्या फ्लाइट UK 122 (BKK-DEL) मध्ये 5 जुलै रोजी दिल्लीत उतरल्यानंतर पार्किंग बेमध्ये नेत असताना किरकोळ विद्युत बिघाड झाला. प्रवाशांची सुरक्षितता आणि सोय लक्षात घेऊन क्रूने विमान पार्किंग बेमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला.

विमानांमध्ये अचानक बिघाड होण्याची अनेक प्रकरणे
देशातील विमानांमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. विशेषत: स्पाइस जेटच्या विमानात काही दिवसांतच जवळपास 8 मोठी प्रकरणे समोर आली असून त्यात मोठा अपघात टळला आहे. दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या एसजी-11 विमानाचे तांत्रिक बिघाडानंतर पाकिस्तानातील कराची येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या घटनेची माहिती देताना स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, इंडिकेटर लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने स्पाइसजेट बी737 विमान कराचीच्या दिशेने वळवण्यात आले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago