देश

धक्कादायक! कार चालवता चालवता ड्रायव्हरचा अचानक मृत्यू, दुचाकीला धडक, मागे बसलेले प्रवासी थोडक्यात बचावले

उत्तर प्रदेश : वाराणसीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोजुबीर परिसरामधील कँट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रस्त्यावर गाडी चालवत असताना चालकाचा मृत्यू झाला. कार रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीला धडकली. गाडीचा वेग कमी असल्याने कोणालाही दुखापत झाली नाही. यावेळी टॅक्सीमधून दोन प्रवासी प्रवास करत होते. या घटनेनंतर प्रवाशांची भंबेरी उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसी येथील टॅक्सी चालक उमाशंकर शनिवारी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दोन प्रवाशांना घेऊन परतत होते. दरम्यान, भोजुबीर येथे पोहोचल्यावर अचानक चालत्या कारमध्ये त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांची कार रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीला धडकली. यावेळी गाडीचा वेग कमी असल्याने कोणालाही दुखापत झाली नाही.

या घटनेनंतर गाडीत बसलेल्या प्रवाशांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून उमाशंकर यांना खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उमाशंकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी मृतदेह ताब्यात घेऊन आवश्यक ती कारवाई करण्यात येत असल्याचे चौकी प्रभारी अर्दाली बाजार शिवानंद सिसोदिया यांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

4 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago