मुंबई

सांताक्रुझ पूर्व येथील खुल्या मैदानातील अतिक्रमण काढा – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : सांताक्रुझ पूर्वेकडील प्रभात कॉलनीनजीक असलेल्या खुल्या मैदानातील अतिक्रमण काढावे, बांधकाम कचरा खुल्या मैदानावर टाकणाऱ्या संबधितावर कारवाई करुन मैदान स्वच्छ करावे, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. सांताक्रुझ पूर्व येथील एच ईस्ट वॉर्ड येथे झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी आमदार पराग अळवनी तसेच सर्व विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री लोढा म्हणाले, सांताक्रुझ पूर्व चोपडा इमारती नजीकच्या प्रभात कॉलनी येथील खुल्या मैदानात बांधकाम कचरा टाकून या जागेवर अतिक्रमण केले असल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. ज्यांनी कचरा खुल्या मैदानावर टाकला आहे त्या संबधितावर कारवाई करुन हे मैदान स्वच्छ करावे. ज्या सोसायटींनी नवीन पाणी कनेक्शनसाठी मागणी केली आहे, ती तातडीने पूर्ण करावी. रस्ता बांधकाम करताना विस्थापित होणाऱ्या नागरिकांचे आधी पुनर्वसन करा मगच शासकीय कामाची कार्यवाही करण्यास प्राधान्य द्यावे. ज्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेशी निगडीत तक्रारी आहेत तिथे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे, अशा सूचना पालकमंत्री लोढा यांनी बैठकीत दिल्या.

नागरिकांनी विविध समस्यांविषयीच्या सुमारे 322 तक्रार अर्ज यावेळी सादर केले. त्यांपैकी 151 अर्जदारांनी पालकमंत्री यांच्यासमोर प्रत्यक्ष उपस्थित राहून समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्याच्याही सूचना पालकमंत्री लोढा यांनी यावेळी दिल्या.

‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमामध्ये नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यासाठी https://mumbaisuburban.gov.in तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका संदर्भात तक्रारीसाठी portal.mcgm.gov.in या लिंकवरही ऑनलाइन तक्रार नागरिकांना करता येतील.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

10 तास ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 महिने ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 महिने ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 महिने ago